समाजाची योग्य माहिती मागासवर्गीय आयोगाला देवून आरक्षण मिळवून देणार

0

महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती व मेंढपाळ ठेलारी धनगर समाजाचा भव्य मेळाव्याचे आरोजन

साक्री । मेंढपाळ, धनगर व ठेलारी समाजाची योग्य माहिती मागासवर्गीय आयोगाला देवून समाजाला आरक्षणाचा लाभ मिळवून देवू, समाज अनेक दशकांपासून उपेक्षित आहे. मेंढपाळ समाजाच्या विकासाठी तसेच आर्थिक उत्पन्न दुप्पट होण्यासाठी विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास आपण प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केले. शहरातील राजे लॉन्स याठिकाणी महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती व मेंढपाळ ठेलारी धनगर समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा. डॉ. विकास महात्मे मार्गदर्शन करीत होते.

खासदार डॉ. विकास महात्मे यांचे प्रतिपादन; विशेष घरकुल योजनेसाठी प्रयत्न करणार
विशेष घरकुल योजनेसाठी प्रयत्न
याप्रसंगी खासदार डॉ. हिना गावित यांनी सांगितले की, आरक्षण देतांना आदिवासी समाज व मेंढपाळ ठेलारी आणि धनगर समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. आपल्या समाजाला विशेष घरकुल योजना मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. यावेळी बापू शिंदे व पंडित मदने यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश सरक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जगदीश शिंदे यांनी केले.

व्यवसायात बदल करा
यावेळी डॉ. महात्मे यांनी सांगितले की, मी मेंढपाळ समाजाचा असून या समाजातील दुःख काय आहेत याची पूर्ण जाणीव आहे. चराई क्षेत्रांवर मेंढपाळांचा हक्क असून त्यांना तो मिळालाच पाहिजे. चिंतामण ठेलारी मारहाण व समाजातील नागरिकांवर झालेले गुन्हे ही बाब खेदजनक असून न्याय मिळवण्यासाठी पाऊल उचलणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तसेच समाजाचा शैक्षणिक व सामाजिक बदल होण्यासाठी व्यवसायात बदल महत्वाचा आहे. मूलभूत गरजा मिळण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. असेही डॉ. महात्मे यांनी सांगितले.

विविध क्षेत्रातील मान्रवरांची उपस्थिती
याप्रसंगी प्रमुख पाहुणे खासदार डॉ. हीना गावीत, धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, पंडित मदने, मोरेश्‍वर झीले, भाजपाचे भीमसिंग राजपूत, संभाजी पगारे, नगरसेविका अ‍ॅड. पूनम काकूस्ते, रमेश सरक, तुळशीराम कोरडकर, भिवा बोरकर, सरपंच वाझदरे अशोक पिसाळ, सरपंच इच्छापूर कमलाबाई सरक, वाझदरे डोमळे, उत्तम सरक, सचिन सोनवणे, नागु लकडे, चिमा कारभारी, लखन दगडे, नाना गोयकर, संतोष मारनर, सुका लकडे, नारायण थोरात, चिंतामण मारनर, शरद मारनार (आंबापूर) व शरद धनगर(विरदेल) आदी मान्यवर उपस्थित होते.