समाजाच्या एकोप्यातून निर्माण होते देशाच्या विकासाची प्रक्रिया

0

निंभोरा। समाजात सर्वांनी एकत्र भावनेने काम करण्याची गरज आहे. हिंदू-मुस्लिम किंवा जातीपातीच्या भेदाच्या पलीकडे एकोप्याने कार्य करीत राहील्यास आपोआप विकासाची प्रक्रिया होत असून यातून देशहितही साधले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केले. निंभोरा येथे जनसंग्राम संघटनेच्या वतीने सालाबादप्रमाणे आयोजित रोजा इफ्तार व स्नेहमिलन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून महाजन बोलत होते.

कार्यक्रमात यांनी केले मार्गदर्शन
संघटनेचे संस्थापक व उपसरपंच विवेक ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी निंभोरा गावाच्या सांडपाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी विवेक ठाकरे यांनी केली. कार्यक्रमाप्रसंगी निंभोरा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, प्रल्हाद बोंडे, वाय.डी. पाटील यांनी उपस्थित हिंदू-मुस्लिम बांधवांना यथोचित मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश येवले, मुझाहीद गुलाब शेख, दस्तगिर पटेल, सुनिल कोंडे, चिनावलचे केळी व्यापारी इरफान सेठ, तांदलवाडी सरपंच श्रीकांत महाजन, जे.के. टेकवाणी, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पवन चौधरी, सुधाकर पूना भंगाळे, हुसैनखा इमामखा,सुधीर मोरे, नरेंद्र ढाके, दत्तात्रय पवार, रहीम शेख, रविंद्र नेहते, बंडू पवार, करीम मन्यार, मोहन बोंडे, समीर पटेल, ज्ञानदेव नेमाडे, मुन्ना पिंजारी, अमोल गिरडे, आरिफ खान, मंजूर पटेल, संदीप कोळी, स्वप्नील गिरडे, विवेक बोडे, दिलीप सोनवणे यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य लोकांची उपस्थिती होती.

यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी मुज्जफर पटेल, महेंद्र कोळी, अमजद खाटीक, नदीम शेख, निलेश भंगाळे, जावेद खाटीक, ललित दोडके, शाकिर खाटीक, फारूक कुट्टीवाले, रियाज पटेल, फारुख हसन शेख, आफताब खाटीक, सुनील सुतार, इलियास खान, जगदीश वायरमन, गौरव ठाकरे, राहुल महाले आदींनी परिश्रम घेतले.