सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श निर्माण करणार्या स्त्रियांचा सन्मान
पिंपरी : स्त्री शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याला यथोचित सन्मान मिळायला हवा. त्यांच्या नावाने दिल्या जाणार्या पुरस्कारांमुळे महिलांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळते. समाजाच्या पाठींब्यामुळेच मी आज शहराचा महापौर बनू शकलो, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. महात्मा जोतिबा फुले मंडळाच्यावतीने क्रांतीज्योती आद्यशिक्षीका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समाजातील कष्टकरी, स्वावलंबी, स्वत:च्या हिमतीवर पुढे येणार्या, आलेल्या, संकटाची तमा न बाळगता आपआपल्या क्षेत्रात यशस्वी होणार्या किंबहुना इतर स्त्रिया आणि समाजासमोर आदर्श निर्माण करणार्या स्त्रियांचा सन्मान सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन करण्यात येतो. बिजलीनगर येथील चैतन्य सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या वेळी महापौर बोलत होते.
27 महिलांचा केला सन्मान
हे देखील वाचा
महात्मा जोतिबा फुले मंडळाच्यावतीने यावर्षी विविध क्षेत्रात काम करणार्या 27 महिलांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. माजी महापौर अपर्णा डोके, अनिता फरांदे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शले, आयुकातील संशोधक संतोष भुजबळ, शिक्षणाधिकारी सुषमा शिंदे, माळी महासंघाचे विश्वस्त अण्णा गायकवाड, निर्माता मुकेश कणेरी, चेतन भुजबळ, सुहास गार्डी, राजेश करपे, नरहरी शेवते, विश्वास राऊत, सूर्यकांत ताम्हाणे, अनिल साळुंके आदी उपस्थित होते.
यांना मिळाला पुरस्कार
आदर्श माता पुरस्कार पार्वतीबाई जमदाडे, शांताबाई माळी, कमला भोंडवे, सुंदर भोसले, लक्ष्मीबाई करपे, द्रौपदाबाई भुजबळ, जगदेवी नेल्लगी, जयवंताबाई लोखंडे यांना मिळाला आहे. समाज भूषण पुरस्कार मालती भुजबळ, अश्विनी गायकवाड, लक्ष्मीबाई गायकवाड, कविता वाल्हे, उमा क्षीरसागर, छाया गोरे, फरीदा मुल्ला यांना मिळाला आहे. उद्योग भूषण पुरस्कार मनीषा गवळी, विद्या भागवत यांना मिळाला आहे. आदर्श शिक्षिका पुरस्कार श्रीप्रिया नागराजन, पूनम बंब, सुषमा पाटील यांना मिळाला आहे. कला भूषण पुरस्कार स्नेहा सावजी, सायली सोनवणे, सिमरन सय्यद यांना मिळाला आहे. पत्रकार भूषण पुरस्कार अर्चना मोरे यांना मिळाला आहे. क्रीडा भूषण पुरस्कार गिरीजा लांडगे, प्रगती गायकवाड यांना मिळाला आहे. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी केले. आभार हिरामण भुजबळ यांनी मानले.