बभळाज। येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मेंढपाळ ठेलारी (धनगर) समाज संघटनेच्या फलक अनावरणाचा कार्यक्रमही पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर आरक्षण संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख विठ्ठल मारकर होते. उत्कृष्ट बंदीस्ट शेळीमेंढी पालनाचे 11 पुरस्कार मिळविलेले खामगाव येथील दादाराव हटकर यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फलकाचे अनावरण
समाजाने आजपर्यंत मेंढपाळाचा पारंपारिक व्यवसाय केला आहे. मात्र व्यवसाय करतांना त्याची पद्धत बदलणे काळाची गरज आहे. त्यामुळे रानावनात फिरणे, पाणी पावसाचा सामना करणे, मुलं बाळ स्त्रियांचे हाल पहाणे हे दुर्दैव समाजाच्या वाट्याला आले आहे. ते थांबेल सुखाची जिंदगी जगता येईल, असे प्रतिपादन दादाराव हटकर यांनी केले. कार्यक्रमास लखन रूपनर बाभळे, प्रा.संजय पाटील, जि.प.सदस्य मनोज धनगर, पं.स.उपसभापती संजय पाटील, सरपंच जगन्नाथ महाजन, उपसरपंच डॉ.बाळकृष्ण महाजन, विका चेअरमन लक्ष्मण पाटील, व्हा.चेअरमन दर्यावसिंग जाधव, अविनाश पाटील, खंडू कुलाड, नाा कोळपे, पंडीत एाके, श्रीमती भटूबाई ठेलारी, पाहुबा गोयकर, सुभाष तांबे, भरतसिंग राजपूत, हिंमत महाजन, छोटूसिंग राजपूत, बंटी लांडगे, संतोष परदेशी, हिंमत धनगर, राहुल वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांची उपस्थिती होतेी.