समाजातील अनिष्ट रूढींवर सत्यपाल महाराजांचा प्रहार

0

भुसावळ । तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील रहिवासी व स्वातंत्र्यपूर्व काळातील महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते कै.गोविंदराव बुवा बडगुजर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्तखंजिरी वादक व राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपालजी महाराज यांचे प्रबोधनपर कीर्तन झाले. महाराजांनी समाजातील अनिष्ट प्रथांवर घणाघाती प्रहार करून उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले.

फुले, शाहू आंबेडकरी विचारधारा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या विचारांची कीर्तनाद्वारे मांडणी केली. महाराजांनी कै.गोविंदराव बुवा बडगुजर यांच्या शैक्षणिक व सत्यशोधकी समाजकार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक सुधाकर बङगुजर यांनी केले. माजी विद्यार्थी आनंद सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले तर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी यांनी आभार मानले. गावातील महात्मा गांधी छात्रालयातील माजी विद्यार्थ्यांनी आयोजन केले होते.