येरवडा : समाजातील गोरगरीब व गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे ही काळाची गरज असल्याचे मत शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी व्यक्त केले. येरवडा येथे पक्षाच्या वतीने स्व. राजीव गांधी रुग्णालयात गरजू महिलांना साडी वाटप तसेच डोळे तपासणी व चष्मा वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शिव व्यापारी सेनेचे शहराध्यक्ष आनंद गोयल, नगरसेवक संजय भोसले, अविनाश साळवे, श्रीशेठ चव्हाण, किशोर पाटील, जितेंद्र शेलार, यशवंत शिर्के, संजय वाल्हेकर, भाऊसाहेब कापडे, चंद्रकांत साठे, संतोष भोसले, माजी उपमहापौर नंदू मोझे, सुरेश पवळे, प्रमोद मोरे, निखिल जाधव, डॉ. धनंजय नील, मनीषा जाधव, दीपाली गळंगे, खरीब सपा, माधुरी सोनवणे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी 300 महिलांना साडी वाटप व दंत तपासणी व 150 जणांचे डोळे तपासणी करून त्यांना चष्मांचे वाटप करण्यात आले. सामंत म्हणाले, येरवडा भागात जास्त प्रमाणात सर्वसामान्य कुटुंब असून ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असतात. त्यांच्यासाठी राबविण्यात आलेले हे कार्य कौतुकास्पद असून याचा आदर्श घेऊन अनेक शिवसैनिकांनी पुढाकार घेऊन गरिबांना मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन निलेश भोसलेकर केले व बबलू चव्हाण यांनी आभार मानले.