फैजपूर । समाजातील प्रत्येक वंचित घटकांना मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समाजात बहुतांश बालक हे शिक्षणापासून वंचित राहतात. पर्यायाने त्यांचा विकास खुंटून त्यांची संपूर्ण पिढी शिक्षणाअभावी दारिद्रयाचे जीवन जगते. या बालकांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन त्यांची पिढी सुधारण्यास हातभार लागेल, असे प्रतिपादन शास्त्री भक्तिकिशोरदास यांनी केले. मधुकर साखर कारखान्याने सुधाकर चौधरी यांचा सेवापुर्ती कार्यक्रम नुकताच पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रास्ताविक सचिव तेजेंद्र तळेले यांनी केले.
चौधरी यांचे कार्य उल्लेखनीय
संचालक महेश सदरे यांच्या हस्ते सुधाकर चौधरी यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी सुधाकर चौधरी यांनी बालकांसाठी आनंददायी उपक्रम राबवून उल्लेखनिय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संस्थांनी त्यांना सन्मानित केले असल्याचेही शास्त्री भक्तिकिशोरदास यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी उपाध्यक्ष भागवत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक गणेश नेहेते, भागवत पाचपोळे, मुकुंदा भंगाळे, पुंडलिक माळी, रेखा भंगाळे, रविंद्र माळी, युनियन अध्यक्ष गिरीश कोळंबे, एकनाथ लोखंडे, ज्ञानदेव पाटील, किरण चौधरी, प्रकाश किरंगे, विनोद फेगडे, विकास चोपडे, ज्योती तळेले, सुशिला होले, मोहन पाटील, डी.के. भारंबे, सचिन चौधरी आदींची उपस्थिती होती.