समाजात शांतात प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्नशील

0

सासवड । आपल्या कार्यक्षेत्रात सर्वसामान्य न्याय देणे आणि समाजात शांतात प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच कोणत्याही दबावाला न जुमानता कायदा, सुव्यवस्था आणि शांतता राखली जाईल, असे भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले.

तसेच ज्या ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय सुरू असतील, तेथील ते व्यवसाय पूर्णपणे बंद केले जातील. तसेच महिला आणि मुलींना सासवड आणि परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण राहील, यासाठी दामिनी आणि निर्भया या पथकांच्या माध्यमातून टवाळखोरी करणार्‍यांचा बंदोबस्त केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. भोर उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते यांची पुणे येथे रेल्वे पोलीस अधिकारी म्हणून नुकतीच बदली झाली. त्यांच्या जागेवर जाधव यांनी सासवड येथील कार्यालयात पदभार स्वीकरला. 2013 मधील बॅचचे अधिकारी असलेल्या जाधव यांनी यापूर्वी गडचिरोली येथे 2 वर्षे याच पदावर सेवा केली असून त्यानंतर त्यांची थेट सासवड येथे बदली झाली आहे. पोलीस खात्यात कुठेही गेले तरी 3 वर्षासाठीच नियुक्ती असते. त्यानंतर बदली होते. महामार्गावरील पेट्रोलिंग वाढवून वाहतूक पोलिसांचा वावर वाढविला जाईल. तसेच महामार्गावरील चोर्‍या रोखणे यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि प्रबोधनात्मक उपक्रमांवर भर द्यावा. सर्वसामान्य व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता शांततेत उत्सव पार पाडावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.