समाजाने केलेला सत्कार सर्वतोपरी

0

भुसावळ  : आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की मी नगरसेवक होईल मात्र समाजकार्याच्या बळावर जनतेने भरभरुन प्रेम दिले व मी निवडून आलो. ज्या वॉर्डात माझ्या समाजाचे मूठभर घर असतांना इतर समाजाने मला मोठे केले त्यांचा मी कायम ऋणी राहिल. माझा अनेक ठिकाणी सत्कार झाला मात्र ज्या समाजात जन्मलो त्या समाजातर्फे होणारा सत्कार माझ्यासाठी सर्वतोपरी आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी केले. क्षत्रिय राजपूत नवयुवक मंडळाच्या वतीने नगरसेवक ठाकूर यांचा चव्हाण ऑप्टिकल सभागृहात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजयसिंग चव्हाण हे होते.

समाजाच्या जागेसाठी प्रयत्न करणार
सर्वप्रथम गणेशपूजन करुन महाराणा प्रतापांना आदरांजली अर्पित करण्यात आली. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष अनुपसिंग ठाकूर यांनी केले तर अध्यक्षीय भाषणात समाजासाठी एखादी मोठी जागा असावी यादृष्टीने प्रयत्न व्हावे, असे चव्हाण म्हणाले तर ठाकूर यांनी त्यास दुजोरा देवून हे काम करण्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी शंभुसिंग ठाकूर, मंगलसिंग ठाकूर, भिमसिंग ठाकूर, राजेंद्रसिंग चव्हाण, सागरसिंग ठाकूर, निरजसिंग राजपूत, विरेंद्रसिंग राजपूत, राजेंद्रसिंग ठाकूर, प्रदिपसिंग ठाकूर, विनोदसिंग ठाकूर, देवेशसिंग ठाकूर, चंदनसिंग ठाकूर, भुपेसिंग राजपूत, अनिलसिंग ठाकूर, देवेंद्रसिंग परदेशी व समाजबांधव उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार अनुपसिंग ठाकूर यांनी मानले.