समाजाने धर्माशी निष्ठा राखावी तरच उध्दार

0

जळगाव। मी आणि माझा परिवार हा विचार जोपर्यंत बदलत नाही आणि समाज धर्माशी निष्ठा ठेवत नाही तोपर्यंत समाजाचा उध्दार होवू शकत नाही असे आवाहन आध्यात्म सरोवराचे राजहंस जैन संत, शिरोमणी आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य अक्षयसागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून उपस्थितांना केले.

प्रवचनात यांची होती उपस्थिती
आपल्या प्रवचनात अक्षयसागरजी महाराज म्हणाले की, धर्माबद्दल जोपर्यंत आपुलकीची, एकतेची भावना निर्माण होणार नाही. तोपर्यंत परिवार संस्कारीत होणार नाही. धर्माशिवाय राहणारा पशू समान असतो म्हणून धर्माशी घट्ट असे नाते जोडा असे अक्षयसागरजी महाराज म्हणाले. पिंप्राळा रोडवरील यश प्लाझा येथे झालेल्या या प्रवचनाची सुरूवात मंगलाचरणने करण्यात आली.यावेळी जैन समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गणेश डेरेकर, महावीर सैतवाल, राजेंद्र सुलाखे, दीपक फुलमोगरे, दीपक जैन, अजय सूर्यवंशी, श्रीकृष्ण चतुर, पवन जैन, चिंतामण मिरकर, चंदन जैन, प्रफुल सैतवाल, किरण काळे, योगेश काळे, सतिश सूर्यवंशी, सागर जैन, रमेश जैन, महिला मंडळाच्या उषा सुलखे, भारती फुलमोगरे, रत्नमाला सैतवाल, वर्षा जैन, लक्ष्मी चतुर, ज्योती सूर्यवंशी, संगीता सैतवाल, रेश्मा सैतवाल, कल्पना जैन आदींनी परिश्रम घेतले.