समाजाने साथ दिली तर मुख्यमंत्रिपदाचे स्वप्नही साकार करेल!

0

बार्शी : लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांनी तू स्वतःच्या कर्तत्वाने मोठा हो, हा मला दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. त्यांच्या विचाराप्रमाणेच संघर्षाचा वारसा मागील पाच वर्षात पुढे नेला. ते आज असते तर त्यांची छाती अभिमानाने फुलून गेली असती. साहेबांना मुख्यमंत्री पाहण्याची समाज आणि सर्वांची इच्छा होती. समाजाने साथ दिली तर साहेबांचे हे स्वप्नदेखील पूर्ण करेन, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले अन् त्याला राज्यभरातून आलेल्या वंजारी समाजबांधवांसह बहुजन समाजाने एकमुखी पाठिंबा दर्शविला. बार्शीतील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित बहुजन वंजारी समाज मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते. याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समाजरत्न पुरस्काराने मुंडे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. यावेळी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे यांनाही सन्मानित करण्यात आले.

स्व. गोपानाथ मुंडेंना एका समाजापुरते बंदिस्त करू नका!
या कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, गटनेते दीपक राऊत, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, वंजारी समाजसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर, विक्रम सावळे, मदन दराडे, रामेश्वर मुंडे, खुशाल मुंडे बाबुराव जाधवर, रावसाहेब जाधवर, नवनाथ मुंडे, अ‍ॅड. शिवाजी जाधवर, अ‍ॅड.दादासाहेब नागरगोजे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. धनंजय मुंडे पुढे म्हणाले, राज्यात विरोधी पक्षनेत्याची ताकद काय असते, ती सत्ता परिवर्तनही घडवू शकते हे स्व. गोपीनाथजी मुंडेसाहेबांनी दाखवून दिले आहे. मुंडेसाहेब हे केवळ वंजारी समाजाचे नेते नव्हते ते बहुजनांचे नेते होते, त्यांना एका समाजामध्ये बंदीस्त करू नका, लोकनेता कसा असावा हे साहेबांनी आपणास दाखवून दिले आहे. अनेकवर्षे विरोधात राहून केलेल्या संघर्षानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर अभिनंदनाचा पहिला फोनही मीच केला होता. मुंडेसाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

22 वर्षे सावलीसारखा सोबत असतांना जे मुंडेसाहेब मी पाहिले ते कुणीही पाहिले नाहीत. आमच्या कुटुंबात दुर्देवी घटना घडल्या. मुंडेसाहेब आपणास सोडून गेले त्याचे खूप दु:ख आहे. माझे रक्ताचे नाते असतांनाही मला डोळ्यातून अश्रू काढण्याची बंदी व्हावी, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. चित्रपटातील खलनायकाप्रमाणे समाजात माझी प्रतिमा तयार करण्यात आली होती. साहेबांच्या पश्चात समाज माझ्याकडे आज मात्र विश्वासाने पाहत आहे, त्याच्याइतका कोणताही सन्मान अथवा मोठे पद नाही.
– धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते

या मान्यवरांचा समाजरत्न पुरस्काराने झाला सन्मान
अशोक बांगर (जामखेड), पुरुषोत्तम सांगळे (पुणे), संतोष ढाकणे (बार्शी), संतोष कांदे (नाशिक), डॉ. अमोल गिते (मुंबई), विशाल गरड (बार्शी), अ‍ॅड. हर्षवर्धन पाटील (बार्शी), कु. नयन बारगजे (बीड), अ‍ॅड. गणेश शिरसाट (पुणे), मेघराज दराडे (पुणे), जुनैद आतार (लातूर), सत्यभामा जाधवर (बार्शी), अ‍ॅड. अशोक मुंडे (अंबाजोगाई), शांताराम जाधवर (बार्शी), गणेश तोगे (बार्शी), मल्लिकार्जुन धारूरकर (बार्शी), लक्ष्मण मस्के (बार्शी), कॅप्टन संजय उगलमुगले (संगमनेर), डॉ. गणेश राख (पुणे), धनंजय गुट्टे (अहमदपूर), अभिमान मुंडे (रत्नागिरी), भास्कर बडे (लातूर). इतर सत्कार : आदिती सोनवणे, महेश घुगे, स्वप्नील सोनवणे, वैभव दराडे,
नवनाथ मुंढे, मेजर सुमंत जाधवर.