गेल्या फेब्रूवारीत आम्ही कुबेर येथील स्वामीनारायण मंदिराच्या परिसरात दर्शन झाल्यानंतर फिरत असतांना, अचानक एक 10 / 12 वर्षाचा मुलगा दिसला. त्याचे आईवडील त्याला हाताने धरून सर्व रमणीय परिसर दाखवत होते. आम्ही त्यांच्या जवळ गेलो विचारपूस केली तेव्हा कळाले की , राहूल त्यांचा एकुलता एक मुलगा असून तो दिव्यांग आहे. थोडावेळ मन खूप हेलावून गेले. कारण त्याचवेळी त्याच्या बरोबरीची इतर मुले खुप मौज मजा करीत होती. त्यांचे आईवडील ही शपक्षेू करीत होते. पण…… पण मला त्याच्या आई वडीलांचा खुप अभिमान वाटला कारण ते सांगत होते , की आम्ही आमच्या राहुलला प्रत्येक ठिकाणी नेत असतो , प्रत्येक गोष्टीचा आनंद , अनुभव त्याला देण्याचा प्रयत्न करीत
असतो.
शासनाने विशेष गरजा असणार्या मुलांना विविध सोयी ,सवलती देण्याबाबत व त्यांच्यात एक दिव्यक्षमता असते त्यामुळे विकलांग ऐवजी ’दिव्यांग ’ असे संबोधावे असा शासन निर्णय झाला.
अपंगत्व ही एक शारीरिक अवस्था असून कोणताही रोग नाही. त्यामुळे दिव्यांगाबाबत कोणीही गैरसमज करू नये.
दिव्यांगाचा सन्मान
हाच आमचा अभिमान
21 मार्च हा दिवस जागतिक डाऊन सिंड्रोम दिन म्हणून पाळला जातो. मग ( दिव्यांग ) डाऊन सिन्ड्रोम म्हणजे नक्की आहे तरी काय? डाऊन सिंड्रोमचे विश्लेषण सर्वात प्रथम 1886मध्ये ङरपसवेप ऊेुप यांनी केले. ते लंडनमधील फिजीशियन होते.
ह्या मुलांची चेहर्याची ठेवण सामान्य मुलांपेक्षा वेगळी असते, मेदप्रधान शरीर , हस्तरेषांमध्ये फक्त ’ सिमीयन रेषा ’ तळहातावर असते .ही शारीरिक वैशिष्टये दिसतात. त्यामुळे या दिव्यांगाच्या समस्या जाणून, समजुन घेऊन त्यांचा विकास कसा करता येईल यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलो तरच खर्या अर्थाने विकासातील सामाजिक विषमता दुर होऊन सर्वांचा विकास हे स्वप्न पूर्ण होईल.
सामान्य मुलांच्या क्षमतांचा विकास व्हावा असे त्यांच्या पालकांना वाटते त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या पालकांना देखील त्याच्या भविष्याची अधिक काळजी वाटते त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आज दिव्यांगासाठी जागतिक आरोग्य संघटना, संशोधन संस्था, सेवाभावी संस्था कार्यरत आहे. दिव्यांगाबाबत उत्कृष्ट कार्ये करणार्यांना राष्ट्रपतींमार्फत राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.
सरकारने दिव्यांग विषयक कायदा केला आहे. दिव्यांगांचे प्रश्न सोडविणे हा या कायदयाचा मुख्य हेतू आहे.
‘डरने की क्या बात है
हम दिव्यांग के साथ है ’
ही भावना प्रत्येकाने दिव्यांगामध्ये निर्माण केली पाहिजे.कारण काही दिव्यांग अजुनही समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेली दिसत नाही. त्यांच्या प्रगतीत अडसर समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. दिव्यांग व्यक्ती आपल्याच समाजाचा अविभाज्य घटक आहे असुन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरता समाजजागृती करणे आवश्यक आहे. त्यांना सामाजीक, आर्थिक क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून द्यावी. त्यांचे प्रश्न, समस्यांवर उपाययोजना कराव्या. कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. त्यासाठी स्पेशल विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले आहे.
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत या मुलांना सर्वसामान्य मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षणाबरोबच त्यांना लागणारे आवश्यक साहित्य पण दिले जाते. सुविधा पुरविल्या जातात. अजुनही जे दिव्यांग यापासून वंचित आहेत त्यांना आपण सर्व मिळून या गोष्टींचा लाभ दिला तर खर्या अर्थाने त्यांना जगण्याची दिशा मिळेल ,त्यांच्यातील कलागुणांना संधी मिळेल . ज्या दिव्यांगांनी उंच झेप घेतली आहे अशा ’हेलन केलर ’ अमेरिकन विद्यापिठात प्राध्यापिका, लेखिका, समाजसेविका म्हणून विश्वविख्यात आहेत. ’ लुईस ब्रेल ’ अपघातात अंधत्व येऊनही ब्रेल लिपी तयार केली जिचा उपयोग जगातील सर्व अंध व्यक्तीना होत आहे. ’ सुधाचंद्रन या सिनेतारीकेने अपघातात पाय गमावला तरी शास्त्रीय नृत्य, अभिनयाच्या जोरावर जगभर कीर्ती मिळविली.
पुण्याच्या ’ गौरी गाडगीळने डाऊन सिंड्रोम आजारावर मात करून जलतरण स्पधैत भारताला 2 वेळा रजत व2 वेळा कास्य पदक मिळवून दिले. किती महान गोष्ट आहे ही आपल्या सर्वसामान्यांसाठी आणि आपल्या देशासाठी. तसेच नाशिक प्रबोधिनी ट्रस्ट मधील दिव्यांग विजय अशोक पाटील हा विद्यार्थी उत्कृष्ट नृत्य करतो. त्याने दम दमा दम, डान्स महाराष्ट्र डान्स, डान्स इंडिया डान्स अशा विविध कार्यक्रमात सहभागी झाला. खरोखरच अशी दिव्यांग म्हणजे समाजासाठी आदर्श आहेत. चला तर.. मग आपण देखील जागतिक डाऊन सिन्ड्रोम दिनानिमित्त दिव्यांगाना नवी आशा, नवी दिशा दाखवू. आणि एकत्र म्हणू या –
॥ दिव्यांगांना देऊ संधी
वाहिल विकासाची नांदी ॥
– श्रीम.ज्योती .रामराव पाटील शिक्षिका , आश्रमशाळा मैंदाणे, ता. साक्री. जि. धुळे