समाजाला दिशा देण्यासाठी जेष्ठांची मदतः आमदार लांडगे

0

चिखलीत एकता जेष्ठ नागरीक संस्थेची स्थापना

भोसरी-समाज सुसंस्कृत करण्यासाठी जेष्ठ नागरीकांची भुमिका खूप महत्वाची ठरत असते. त्या अनुसरुनच सतत अशा जेष्ठ नागरीक संघाची मदत होत राहते. तेच कार्य या जेष्ठ नागरीक संघाकडून देखील होईल यात शंकात नाही, असे उद्गार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी काढले. चिखली-मोशी एकता जेष्ठ नागरीक संघाच्या स्थापनेवेळी आमदार लांडगे बोलत होते. यावेळी नगरसेवक राहुल जाधव, उद्योजक संतोष बारणे, शिवाजी बारणे, नरसेविका आश्‍विनी जाधव, सचिन बारणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गट कार्यवाहक विलास पवार, नागरीक संघाचे अध्यक्ष मनोहर वलोकर, उपाध्यक्ष रमेश कुलकर्णी, सचिव योगीराज देव व अनेक जेष्ठ नागरीक उपस्थित होते. हा कार्यक्रम रविवारी स्वराज गृहसोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये आयोजित करण्यात आला होता.

ज्येष्ठांमुळे होते मदत
यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले की, जेष्ठांमुळे अनेक कार्यास मदत होऊन एक नियोजनबद्ध लोकहिताच्या कामास मदत होत आहे. चिखली-मोशी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहत असून अऩेक लोक या ठिकाणी राहण्यास येत आहेत. त्यामुळे त्यांना येणार्‍या अडचणी या जेष्ठ नागरीक संघाच्या माध्यमातून नक्कीच सोडविल्या जातील. तर उदयोजक संतोष बारणे यांनी देखील या जेष्ठ नागरीक संघाला माझ्या कडून सर्वोतपरी सहकार्य मिळेल असे सांगितले.