शिंदखेडा। शिंदखेडा तालुक्यात टोकरे कोळी समाजावर सतत अन्याय होत आहे. अक्डसे ता. शिंदखेडा येथील छोटू सैंदाणे यांचा एकुलता एक मुलगा सतिष हा तापी नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खननात बळी गेला. त्यासंदर्भात प्रांतधिकारी,तहसिलदारसह 10 जणांवर 304 सारखा गंभीर गुन्हा दाखल असताना तीन महिन्यात एकाही आरोपीला राजकिय दबावापोटी पोलिसांनी अटक करण्याचे धाडस दाखवले नाही. म्हणून त्या 10 आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. यासाठी आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे संस्थापकप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. या मोर्चात मयत सतिष छोटू सैंदाणेदेखील सहभागी होऊन न्याय मागणार आहे. त्याचप्रमाणे रंजाणे ता. शिंदखेडा जि. धुळे येथील सुनिल बैसाणे व ईश्वर कोळी यांच्या परिवारामध्ये किरकोळ वाद झाले. त्यावरून सुनिल बैसाणे यांनी ईश्वर कोळी यांच्या कुटुंबावर अँट्रासिटीचा गुन्हा दाखल केला होता.
गरीब परिवारावर बेकायदेशीर कार्यवाही
तरी ही पोलिसांनी कायदा हातात घेऊन या गरीब परिवारावर बेकायदेशीर कार्यवाही केली. एकिकडे अक्डसे ता.शिंदखेडा येथील आदिवासी टोकरे कोळी कुटुंबातील छोटू सैंदाणे यांचा मुलगा सतिष याचा तापी नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खननात बळी गेला. त्यासंदर्भात 10 जणांनावर 304 चा गुन्हा दाखल असताना शिंदखेडा पोलिस मुगगिळून गप्प बसले आहेत.दुसरीकडे टोकरे कोळी परिवारावर खोटा गुन्हा दाखल करतात. ऑट्रासिटीचा गुन्हा रद्द होण्यासाठी शानाभाऊ सोनवणेच्या मदतीने प्रताप जाधवर वकिलामार्फत औंरगाबाद खंडपिठात गुन्हा रद्द होण्यासाठी केस दाखल केली त्याचा निकाल खंडपिठाने दिला. त्यात म्हटले आहे की अॅट्रासिटीचा गुन्हाखाली टोकरे कोळी जमातीच्या लोकांवर कोणतीही कार्यवाही होऊ शकत नाही. तसेच त्यांना हा कायदा ही लागू होत नसल्याचे आदेशात न्यायमूर्ती आर.एम.बोर्ड व ए. एम. ढवळे यांनी म्हटले आहे. म्हणून खोटा गुन्हा दाखल करणार्या पोलिसांना निलंबित करून योग्यती कार्यवाही करावी या व इतर मागण्यांसाठी दि.22 रोजी सकाळी 10 वाजता शिंदखेडा पोलिस्टेशनवर पोलिसांच्या निषेधार्थ मोर्चा निघणार आहे. तरी समाज बांधवानी शिंदखेडा येथे भगवा चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आव्हान पवन सोनवणे, छोटू सैंदाणे,वासुदेव चित्ते,मोठाभाऊ कोळी,बबलू कोळी,किरण सावळे यांनी केले आहे.