भुसावळ : दिवसभरातील घडामोडींना समाजासमोर आणण्याचे काम पत्रकार करीत असतात प्रत्येक पक्षाचे स्वतंत्र मतदार असतात. प्रसार माध्यमांच्या संदेशानुसार त्यांच्या भुमिकेत बदल होत असतो. आणि हेच चार ते पाच टक्के मतदार संपुर्ण सरकार फिरवित असतात. त्यामुळे सरकार कुणाचे आणायचे हे काम प्रसार माध्यमे करीत अससल्याचे आमदार सावकारे यांनी सांगितले. त्यामुळे माध्यमांनी चांगल्या गोष्टींना प्राधान्य देऊन अनुचित प्रकारांना उजेडात आणण्याचे काम करावे, तसेच समाज घडविण्यासाठी सकारात्मक वृत्तांकनाची गरज असून वृत्तपत्रात गुन्हेगारी विषयक वृत्तामुळे युवा पिढीवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे हि पिढी वाममार्गाकडे जाण्याची भिती असते. त्यादृष्टीने समाजनिर्मितीसाठी सकारात्मक वृत्तांना प्राधान्य देण्याचे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी केले.
दर्पणकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात स्वच्छता अभियान राबविण्यात येऊन व्यापारी संकुलातील साफसफाई करण्यात आली. यानंतर गडकरी नगरातील संत गाडगेबाबा वस्तीगृहात अनाथ विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय सावकारे बोलत होते.
पालिकेच्या चांगल्या कामांना सहकार्य करा
यानंतर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले की, पत्रकारिता हा लोकशाहिचा चौथा स्तंभ आहे. या स्तंभाकडे सर्वसामान्य जनता अपेक्षेने पाहते. वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या मसुद्यावरुन समाज मन घडत असते. त्यामुळे पालिकेत होणार्या चांगल्या कामांना न्याय द्या तसेच काम करीत असताना आमच्याकडून काही चुका झाल्यास आम्हाला वृत्तपत्राच्या माध्यमातून तडाखे मारा यातून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करु याचा राग मानून घेणार नाही अशी भुमिका नगराध्यक्ष भोळे यांनी स्पष्ट केली. यावेळी मंचावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष संजयसिंग चव्हाण, सचिव हेमंत जोशी, माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, भाजपा गटनेते हाजी मुन्ना तेली, नगरसेवक किरण कोलते, मुकेश गुंजाळ, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वरणगाव येथे प्रतिमा पूजन
वरणगाव येथे पालिका सभागृहात बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, चंद्रकांत बढे, डॉ. हर्षल चॉदा, सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप गागुर्डे, पीएसआय निलेश वाघ, मिलींद मेढे, दिपक मराठे, नगरसेवक सुनिल काळे, राजेंद्र चौधरी, रवि सोनवणे, बबलु माळी, डॉ. विनोद चौधरी, आरोग्य सभापती माला मेढे, नगरसेवीका वैशाली देशमुख, प्रतिभा चौधरी, रोहीणी जावळे यांसह पत्रकार विजय वाघ, संतोष माळी, भूपेन्द्र महाजन, संतोष गौड, राजु खडसे, अमोल पाटील, अजय जसवाल, विनोद सुरवाडे, सुरेश महाले, संजय माळी आदी उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
स्वच्छता अभियानात मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष संजयसिंग चव्हाण, सचिव हेमंत जोशी, उपाध्यक्ष प्रकाश तायडे, खजिनदार विनय सोनवणे, श्रीकांत जोशी, गोपाळ रोकडे, आशिष पाटील, विजय ठक्कर, उदय जोशी, किशोर शिंपी, संतोष माळी, भुपेंद्र महाजन, देव सरकाटे, प्रेम परदेशी, उज्वला बागुल, विनायक सपकाळे, चेतन चौधरी, राजेश तायडे, कालू शहा, कमलेश चौधरी, वसीम शेख, प्रकाश पवार, राजू चौधरी, शकील पटेल, अमोल पाटील, कपिल नेवे, शिवनारायण लोखंडे, सुनिल सुर्यवंशी, इकबाल खान, संजय ठाकूर, संजय काशिव, गोपी म्यांद्रे, विनोद गोरदे, विशाल सुर्यवंशी, रेल्वेचे निवृत्त राज शिष्टाचार अधिकारी जी.आर. ठाकूर, नृपूर कथ्थक अकादमीचे संचालक रमाकांत भालेराव, संदिप देवडा आदींनी सहभाग घेतला. तसेच स्वच्छता अभियानास पालिका कर्मचार्यांनीदेखील सहकार्य केले.