एरंडोल । जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा राजस्थानी महिला मंडळाच्या प्रदेश उपाध्यक्षा विजया वसंत जाजु (वय 68) यांचा मालेगाव नजिक उमराणे गावाजवळील वाकीफाट्या जवळ अपघातात मृत्यू झाला. त्या मेहुण्या सोबत मुंबई येथुन एरंडोलकडे येत असतांना त्यांच्या वाहनाला एका अवजड वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. विजया जाजु यांचा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग राहत असे. त्या सर्वधर्म समभाव महिला संघटनच्या अध्यक्षा होत्या. तसेच महिला दक्षता समितीच्या त्या सदस्य होत्या. संघटनेच्या वतीने त्यांनी पती-पत्नी मध्ये असलेले कौटुंबिक वाद मिटवुन अनेकांचे संसार पुन्हा उभे केले होते. विजया भाभी या टोपण नावाने त्या सर्वत्र परिचित होत्या.