समाज एकत्र आल्यास अडचणी सहज सुटू शकतात : आ.रघुवंशी

0

नंदुरबार । समाजाची शक्ती एकतेत असते, समाज एकत्र आला की कुठलीही अडचण सहज सुटू शकते असे प्रतिपादन आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. ते येथील संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. नाभिक समाज हितवर्धक संस्थेकडून श्री संत सेना महाराज पुण्यतिथी संजय टॉऊन हॉटेल येथे साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, नगरसेवक दिपक दिघे, अशोक राजपूत आदी उपस्थित होते.कार्यक्रमात सकाळी 8 ते 9 श्री सत्य नारायण महापुजा करण्यात आली. 9 ते 11 पर्यंत श्री संत सेना महाराज भजन किर्तनाचा कार्यक्रम झाला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी आ.रघुवंशी आपल्या मनोगतात म्हणाले, की समाजाची शक्ती ही एकतेत असते. समाज एकत्र असेल तर तो कुठलीही अडचण सहज सोडवू शकतो. नाभिक समाजाच्या समाज मंदिर बांधण्यास आपली पूर्ण सहकार्याची तयारी असल्याचेही यावेळी रघुवंशी म्हणाले.