अॅड.प्रकाश साळशिंगीकर यांचे प्रतिपादन
चोपडा – आपल्या नेवेवाणी समाजात खूप मोठे टॅलेंट आहे. विविध क्षेत्रात समाज बांधव चमकतात. परंतु त्यांचातील सुप्त गुणांना वाव गावोगावी होणार्या या सांस्कृतिक कार्यक्रमातून मिळतो. त्यासोबत गुणवंतांचा सत्कार नानाश्री प्रतिष्ठानने करुन चोपड्यातील प्रगतीला हातभार लावला आहे. समाज घटकांच्या सर्वागीण प्रगतीसाठी या स्वरूपाचे समारंभ सर्वत्र करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील ख्यातनाम फौजदारी वकील अॅड.प्रकाश साळशिंगीकर यांनी केले. अॅड.साळशिंगीकर चोपड्यातील भगिनी मंडळ सभागृहात नानाश्री प्रतिष्ठान आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व गुणवंताच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश वाणी होते.
कार्यक्रमात प्रारंभी गणेश वंदना सादर करण्यात आली. भारतमाता व स्व.नानासाहेब शांताराम तानाजी नेवे यांच्या प्रतिमेचे पुजन केले.प्रस्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत नेवे यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुणे चंद्रकांत जगन्नाथ नेवे(जळगाव),सुनिल बाबुलाल नेवे (साकळी),प्रदीप रघुनाथ लोहारीकर(अहमदाबाद), मंगला सुनिल नेवे(किनगाव), राजेश अंबादास नेवे( पुणे), सुनिल पदमाकर नेवे( डोंबविली) यांचा सत्कार प्रतिष्ठानचे श्रीकांत नेवे, सुरेश नेवे, सतिष नेवे, रंजना नेवे, स्वप्नील नेवे, संगीता पंसारी, प्रा.संजय नेवे यांनी केला. कार्यक्रमात चोपड्यातील नेवे समाजातील विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. यावेळी साक्षी नेवे, डॅा.गौरव नेवे, डॅा.रेणुका राजे, शुभम नेवे, श्रृती वाणी या गुंणवंतांचा विशेष सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.तसेच शैक्षणिक नैपुण्य मिळविणार्यांचा सत्कारही करण्यात आला.
यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रकाश वाणी यांनी समाजातील या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. तसेच समाज बांधवांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी सत्कारार्थी व अतिथींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौरभ नेवे यांनी केले. आभार सचिन नेवे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सागर नेवे, रमाकांत नेवे, गोपाळ नेवे, मनोज नेवे, राजेंद्र नेवे, आकाश नेवे, संगिता पंसारी, प्रतिभा नेवे,जागृती नेवे, श्वेता नेवे, संगिता नेवे, शुभदा नेवे, भारती नेवे, मोहिनी नेवे, गायत्री नेवे, पल्लवी नेवे, दिपीका नेवे, प्रगती नेवे आदींनी परिश्रम घेतले.