समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर – के.एम . पाटील
(वरणगांवच्या महात्मा गांधी विद्यालयात झाला शिक्षक सन्मान सोहळा )
*प्रतिनिधी । वरणगाव*
देशाची सुजाण व संस्कारक्षम पिढी समाज घडवण्याचे काम शिक्षक करत असतो या कामात शिक्षकांना समाजाचा देखील पाठबळ आवश्यक असते .एक चांगला देश घडवण्यासाठी प्रत्येक बालकावर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे . यामुळेच भारत देश महासत्ता होऊ शकतो शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन पाठीवरती कौतुकाची थाप मारल्यास काम करण्याची उमेद निर्माण होते चांगला समाज घडवण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यालयाचे माजी प्राचार्य के .एम .पाटील यांनी केले
रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीने शहरातील शिक्षकांना गुरुरत्न पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यालयाचे माजी प्राचार्य के . एम . पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी समीर शेख, वरणगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय परशुराम दळवी , चंद्रकांत बढे , प्रा. जतीन मेढे मोटिवेशनल स्पीकर एहसान शेख , मनोहर सराफ , अल्लाउद्दीन शेख ,माजी ग्रामपंचायत सदस्या रुक्मिणी काळे आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुनील काळे यांनी शिक्षक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करत असतात या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी गुरुरत्न पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे . यामुळे काही शिक्षकांना सन्मानित करण्यात येत असल्याचे सांगितले . तर
मुख्याधिकारी समीर शेख यांनी आपल्या मनोगतात आम्ही घडलो ते फक्त शिक्षकांमुळेच यामुळे शिक्षकांचे नेहमीच ऋणात राहिले पाहिजे असे सांगीतले . पीएसआय परशुराम दळवी म्हणाले की शिक्षक हा ज्ञानाचा महासागर असून त्यांनी दिलेल्या दिशेमुळे आपल्याला जीवनाची योग्य दिशा मिळत असते . चंद्रकांत बढे यांनी समाजाने देखील शिक्षकांवर विश्वास ठेवून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे व त्यावरून मार्गक्रमण केले पाहिजे आज अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले . प्राध्यापक जतीन मेढे यांनी नवीन पिढीला इतिहास समजला पाहिजे या इतिहासामधून चुकांची दुरुस्ती करून भविष्यातील जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन व्यक्त केले .
पुरस्कारार्थी शिक्षक पुढील प्रमाणे –
तुफेल अहमद अब्दुल हक (फक्रुद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल व जुनिअर कॉलेज), सुनील रमेश वानखेडे (महात्मा गांधी विद्यालय) रेखा चौधरी (सुशीला राम कदम प्राथमिक विद्यामंदिर) चंद्रकांत तायडे (गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालय) जहीर इस्माईल पठाण (चंद्रकांत हरी बढे प्राथमिक विद्यामंदिर) उज्वला छगन सोनवणे (जि प प्राथमीक मराठी केंद्र शाळा) राकेश कुलकर्णी (जि प प्राथमीक मराठी मुलींची शाळा) वंदना पाटील (जि प प्राथमिक मराठी शाळा, सिद्धेश्वर नगर) अब्दुल रशीद अब्दुल जब्बार (जि प प्राथमीक उर्दू शाळा क्रमांक १) मिर्झा अक्रम बेग (जि प प्राथमीक उर्दू शाळा क्रमांक २)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देशपांडे यांनी तर आभार गजानन वंजारी यांनी मानले .