जळगाव : पोटासाठी कामानिमित्त गावोगावी भटकंती करणार्या, निवासाची व्यवस्था नसलेल्या, ऊस तोडणी करणार्या आदिवासी बांधवांची कडाक्यांच्या थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे विदगाव परिसरातील आदिवासी वस्तीवर जाऊन कपडे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विदगावचे सरपंच जनार्धन पाटील, माजी उपसरपंच लिलाधर पाटील, ज्येष्ठ साहित्यीक भास्कर चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष आर.डी. कोळी, देविदास पाटील, गुलाब सपकाळे, विजय लुल्हे आदी सहभागी होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल पाटील, भगीरथ शाळेचे आशिष पाटील, भारती चौधरी,मंजुषा भंगाळे, शालिनी सैदाणे, यांनी परिश्रम घेतले. या समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आलेल्या या स्तुत उपक्रमाचे विदगाव वासीयांकडून स्वागत करण्यात येत आहे.