समाज चिंतामणीतर्फे कवी श.मु.चौधरी यांचा गौरव

0

जळगाव। येथील समाज चिंतामणी प्रतिष्ठान सामाजिक संस्थेतर्फे जिल्हाप परिषदेचे समाज कल्याण सभापती प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या हस्ते ज्येष्ठकवी श.मु. चौधरी यांचा गौरव करण्यात आला. अमृतमहोत्सवी वाढदिवस व साहित्य क्षेत्रातील योगदान याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रभाकर सोनवणे म्हणाले की, सामाजिक जडण-घडणींमध्ये साहित्यिकांचे योगदान मोलाचे माझ्या हातून हा सत्कार होत आहे.

कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यीकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांनी अमृत महोत्सव या शब्दातच ‘अमृत’ आहे. हे भाग्य पारत थोड्या लोकांच्या वाट्याला येते, असे सांगितले. सूत्रसंचालन अशोक पारधे यांनी केले. सत्काराला उत्तर देतांना श.मु. चौधरी भारावून गेले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण, भगवान भटकर, निवृत्तीनाथ कोळी, मीना सैंदाणे, युवराज सोनवणे, आर. डी. कोळी, गोविंद पाटील, पुष्पलता कोळी, अशोक पारधे, डी.बी.महाजन, गणेश सोनवणे, कमल सोनवणे, सतिश पवार आदि उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष आर.डी.कोळी यांनी आभार व्यक्त केले.