समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमा

0

जळगाव । समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच प्रारंभी साहित्यिक कवींचे गुरुवर्य पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गुरुमहात्म्य, कविता, विनोदी किस्से गोष्टी सांगण्यात आल्या. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आकाशवाणी केंद्रनिदेशक ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर, प्रा.प्रकाश महाजन, भास्करराव चव्हाण, कवी निवृत्तीनाथ कोळी, पुष्पलता कोळी, अशोक पारधे, गोविंद पाटील, आर.डी. कोळी, शालिनी सैंदाणे आदी उपस्थित होते.