चाळीसगाव – येथील समाज प्रबोधिनी बहुउद्देशीय संस्था चाळीसगावचे महात्मा फुले लाईफ अॅण्ड मिशन सेंटर,”महात्मा फुले नगर, जुने विमानतळ चाळीसगाव येथे रविवारी ९ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी 9.30 बुध्द वंदना, प्रतिज्ञा नंतर ‘बौध्द धम्म आणि वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयावर कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सी.एन. नगराळे म्हणाले की “बौध्द धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. म्हणून आजपर्यंत तो टिकूनच नाहीतर प्रगती वर आहे. जगात त्याला तोड नाही. दुसरे वक्ते मिलिंद झाल्टे यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय हे विषद करताना म्हटले की मुक्त तर्कला धरुन केलेले कोणतेही विधान जे निरीक्षण, परीक्षण काटेकोर तर्क गणित, प्रचिती व प्रयोग याद्वारे सार्वत्रिकरीत्या सिध्द करता येतो. वैज्ञानिक दृष्टीकोनाने मानवाची विश्वाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकली, त्यामध्ये एक मूल्यरचना ही अभिप्रेत आहे. व्याख्याना नंतर महिला वर्गाने प्रबोधन पर गाणे सादर केले शेवटी आभार संदीप पानपाटील यांनी मानले, सूत्रसंचालन प्रा.गौतम निकम यांनी केले. या कार्यक्रमात सहभागी अण्णासाहेब देशमुख, सचिन भोसले, आदित्य झाल्टे, अशोक पाईकराव, नागेश बागुल, मोरे, अहिरे, लक्ष्मण निकम, गोविंद निकम, राजु निकम व फुलेनगर, मिलिंदनगर मधील महिलावर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.