समाज सक्रिय करण्याची ताकद चित्रात

0

चोपडा : चा कर्मयोग जीवनात निर्माण करा कारण माणसाच्या यशात नशिबाचा भाग फार थोडा असतो. जीवनात विज्ञानवाद रुजणे आवश्यक आहे. जीवनात टाईम मॅनेजमेंट व माईंड मॅनेजमेंट महत्त्वाचे आहे. हे कलावंताला साधते. कलेच्या माध्यमातून सामाजिक क्रांती होऊ शकते. समाज सक्रिय करण्याची ताकद चित्रात पर्यायाने चित्रकारात असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरूणभाई गुजराथी यांनी केले. चोपडा येथील भागिनी मंडळाच्या ललित कला केंद्रातर्फे रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित ‘आठवण कलारंग’ या माजी विद्यार्थी मेळाव्यात उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी प्रा अरूणभाई गुजराथी यांच्या हस्ते कला प्रदर्शनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धाटन करण्यात आले. नंतर संस्थेच्या अध्यक्षा स्व डॉ सुशीलाबेन शाह यांना श्रदांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी पुढे बोलतांना प्रा.अरुणभाई गुजराथी म्हणाले, जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही जिथे चित्र वापरले जात नाही. चित्रापुढे शब्द थिटे पडतात. चित्राला मर्यादा असल्यातरी चित्राशिवाय आणि कलेशिवाय जीवनात पूर्णत्व नाही कारण बिंदू आणि रेषा हीच जीवनाची भाषा आहे. याप्रसंगी अश्विनी गुजराथी, प्रा. राजेंद्र पाटील यांनी तसेच माजी विद्यार्थ्यांपैकी पूजा मंडोरे, शिलांबरी अहिरे, परमेश्वर रोकडे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी तसेच आभार प्रदर्शन प्रा गिरधर साळी यांनी केले. ललित कला केंद्रातील माजी विद्यार्थ्यांपैकी 52 जणांना ‘आमची कलाभूषणे’ हा पुरस्कार देऊन मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच माजी विद्यार्थ्यांतर्फे गुरूजनांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास उद्योजक आशिष गुजराथी, प्रसन्न गुजराथी, कवी अशोक सोनवणे, प्रा.आशिष गुजराथी, मोहन चव्हाण, तरूण भाटे जळगाव, सुशील चौधरी, मनोज जंजाळकर, अविनाश मोघे, प्रा. ए.एच. पाटील (खिरोदा), चित्रकार इ.सी.पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यास यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर संस्थेच्या सचीव तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा उर्मिलाबेन गुजराथी, प्रमुख आतिथी महाराष्ट्र राज्याचे चित्र व शिल्प विभागाचे निरीक्षक भास्करराव तिखे, जे जे स्कूल चे प्रा राजेंद्र पाटील उर्फ पारा, पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, नगरसेवक जीवन चौधरी, संस्थेच्या उपाध्यक्षा छाया गुजराथी, संचालिका आश्विनी गुजराथी, चोपडे शिक्षण मंडळाच्या सचिव माधुरी मयूर, धुळे कला महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील तांबे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष
विजया पाटील, महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, मुख्याध्यापिका प्रभावती पाटील, मुख्याध्यापक सुनील चौधरी, डॉ.संजय चौधरी यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.