समाधानकारक बातमी…माता मृत्यूदरात घसरण

0

नवी दिल्ली – भारतातील माता मृत्यूदरात घट होऊन आता तो १३९ वरून १३० वर आल्याची माहिती केंद्रिय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी दिली. नमुना नोंदणी प्रणालीच्या (एसआरएस) आकडेवारीनुसार हा दर २०११-१३ ला १६७ वरून घटत घटत १३० वर पोहचला. नव्याने आलेल्या आकडेवारीनुसार भारतात २०१५ ला माता मृत्यूदर १३९ होता. आता तो घटून १३० वर पोहचल्याने भारताने मिलेनियम डेव्हलपमेंट गोलच्याही (एमडीजी) पुढचा पल्ला गाठला आहे, असेही नड्डा यांनी नमुद केले.

नड्डा यांनी बेटी बचाव, बेटी पढाव, प्रधान मंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, अनेक आरोग्य योजना व प्रबोधन कार्यक्रमांचाही उल्लेख करत यामुळे मोठा फायदा झाल्याचा दावा केला. त्यांनी मंत्रालयाला व राज्य सरकारांनी संयुक्तपणे प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. देशभरात मातांचे प्रसुतीपूर्व, दरम्यान व नंतर असलेले आरोग्य व सुरक्षा याबाबत माहिती सांगणारा प्रमुख घटक म्हणून माता मृत्यूदराच्या आकड्याकडे पाहिले जाते. हा आकडा म्हणजे एका वर्षात प्रत्येकी १ लाख मातांमागे मृत्यू झालेल्या मातांचा आकडा आहे. हा मृत्यू प्रसृतीशी संबंधित कोणत्याही कारणाने झालेला असतो. यात अपघात व प्रासंगिक कारणांचा समावेश नसतो.