समाधानकारक: रिकव्हरी रेटमध्ये भारत जगात अव्वल !

0

नवी दिल्ली: कोरोनाने जगभरात अक्षरश: कहर माजविला आहे. देशात दररोज ६० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता २६ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मागील २४ तासात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत ५७ हजार ९८२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण संख्या २६ लाख ४७ हजार ६६४ वर पोहोचली आहे. दिवसभरात ९४१ मृत्यू झाले आहे. मात्र दिलासादायक म्हणजे देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे अधिक आहे. भारतातील रिकव्हरी रेट हा जगापेक्षाही जास्त आहे. जगातील रिकव्हरी रेट ६५ टक्के आहे तर भारतातील रिकव्हरी रेट ७२ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. आजच्या घडीला देशातील रिकव्हरी रेट ७२.५१ टक्के आहे, रिकव्हरी रेटच्या बाबतीत जगाच्या तुलनेत भारतच आघाडीवर आहे. अद्याप कोरोनावरील लस बाजारात आलेली नाही, मात्र तरीही भारतातील रिकव्हरी रेट हा वाखाणण्याजोगा आहे.

देशभरातील २६ लाख ४७ हजार ६६४ करोनाबाधितांच्या संख्येत, अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ६ लाख ७६ हजार ९०० असून, १९ लाख १९ हजार ८४२ जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तर, आतापर्यंत ५० हजार ९२१ जणांचा मृत्यू झाला आहे.