नवी दिल्ली: करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती आहे. दररोज ६० हजारापेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहे. देशात आतापर्यंत एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ लाख ६ हजा ३४९ इतकी झाली आहे. मागील २४ तासांत ६१ हजार ४०८ करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे आहे. तर ८३६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र एक दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना रुग्णांची रिकव्हरी रेट वाढून ७५ टक्क्यांच्यावर पोहोचला आहे. देशात दररोज करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही ५० हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मागील २४ तासात तब्बल ५६ हजार ८६३ रुग्णांनी करोनावर मात केल्याची माहिती समोर आली होती. आतपर्यंत २३ लाख ३८ हजार ३६ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात ७ लाख १० हजार ७७१ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २२ टक्क्यांच्या जवळ आहे. तर ५७ हजार ५४२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
करोना चाचण्यामध्ये वाढ झाल्यामुळे करोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.
देशात करोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असून गेल्या सात दिवसांमध्ये तब्बल साडेचार लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. तर यादरम्यान ६ हजार ६६६ रुग्णांचा मृत्यूही झाला. या संख्येकडे पाहिल्यास गेल्या सात दिवसांमधील रुग्णांची वाढलेली संख्या ही भयावह असल्याचं दिसत आहे. परंतु दुसरीकडे देशात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या इतर देशांच्या तुलनेत मात्र कमी आहे.