लोणावळा: सुवर्ण जयंती महाराज्यस्व अभियान अंतर्गत मळवली, भाजे संपर्क येथे घेण्यात आलेल्या विस्तारीत समाधान योजना कार्यक्रमामध्ये तब्बल तीन हजार लाभार्थींनी सहभाग नोंदवीत विविध दाखले व अन्य शासकीय योजनांचा लाभ घेतला. नागरिकांना या दाखल्यांचे वाटप मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, तहसिलदार रणजीत देसाई, मावळ सभापती गुलाबराव म्हाळस्कर, मंडल अधिकारी माणिक साबळे, मेहबुब शेख, संदिप बोरकर व उपस्थित आदिवासी महिलांच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी जितेंद्र बोत्रे, किरण राक्षे, गणेश धानिविले, अमोल भेगडे, प्रदिप हुलावळे, मच्छिंद्र केदारी, समीर हुलावळे, चेतन मानकर, अर्जुन पाठारे, कृष्णा घिसरे, सखाराम कडू, सदाशिव बांगर, दत्ता खेंगले, चंद्रकांत कोंढभर, अरुण भानुसघरे, रामभाऊ गोणते, तुळशीराम पिंगळे, नवनाथ कडु याचबरोबर उपस्थित आदिवासी महिलांच्या व विविध गावचे सरंपच, उपसरपंच, सर्व तलाठी, ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.