समाधान शिबीराला प्रतिसाद

0

चाळीसगाव । लोकाभिमुख शासन व प्रशासनामुळे जनतेच्या कामांना गती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि केंद्रात अनेक नवीन लोककल्याणकारी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यांच्याच पारदर्शी कार्याने प्रभावित होऊन चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या ओळीतील शेवटच्या माणसापर्यंत शासकीय योजना पोहचविण्याचा संकल्प केला असल्याचे प्रतिपादन तालुक्यातील मेहुणबारे येथील विस्तारित मुख्यमंत्री समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार उन्मेश पाटील यांनी केले. शिबिराला मेहुणबारे सह तीरपोळे, वरखेडे, खडकीसिम, कढरे, पळासरे, धामणगाव, शिदवाडी, भऊर, जामदा, दस्केबर्डी आदी गावातील 2000 हून अधिक लाभार्थ्यांनी हजेरी लावली तर शिबिराच्या ठिकाणी शासनाच्या महालॅब तर्फे 600 हून अधिक रुग्णांची मोफत रक्त तपासणी देखील करण्यात आली.

यशस्वितेसाठी यांनी केले प्रयत्न
रेशनकार्ड, पगाराच्या योजना, विद्यार्थ्याचे जातीचे दाखले, महिलांना गॅस कनेक्शन आदी गरजेच्या योजनांचा लाभ त्यांना घरपोच मिळत आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने हे समाधान शिबीर ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर समाधान आणणारे असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांमध्ये होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी तहसिलदार कैलास देवरे, के.बी.दादा साळुंखे, संजय भास्करराव पाटील, दिनेशभाऊ बोरसे, विशाल सोनवणे, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांनी मनोगत व्यक्त केले. तर शिबीर यशस्वीतेसाठी राजू शेख, प्रदीप देवरे, चेतन वाघ, हृषिकेश अमृतकार, अनिल देशमुख, सुनील बारवकर, अमोल वाघ, हिरालाल गढरी, नितीन देवरे, सावता महाजन, टिपू महाजन, दिग्विजय देशमुख यांनी परिश्रम घेतले.

लाभार्थींना योजनांचा मिळला लाभ
सदर शिबिरात घरकुल, स्वच्छ भारत अभियान, फळबाग लागवड अनुदान, शेततळे, जननी सुरक्षा योजना,बुडीत मजुरी अनुदान, मृदा आरोग्य पत्रिका, शहरी व ग्रामीण जन्म-मृत्यू-विवाह दाखले, बांधकाम कामगार नोंदणी,कर्ज प्रकरण, शिबिरात नवीन रेशनकार्ड, रेशनकार्ड नाव कमी जास्त करणे, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्नाचे दाखले, वय-अधिवास दाखला, जातीचे दाखले, अभिलेखातील कागदपत्रांच्या नकला देणे, भिल्ल समाज प्रमाणपत्र, बोजे विरहीत सात बारा, संजय गांधी-श्रावणबाळ-इंदिरा गांधी योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना, शेळी मेंढी पालन प्रशिक्षण, फेरफार नोंदी, महावितरण च्या योजना, समाज कल्याण व महिला बालकल्याण विभाग योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण, आदी योजनांचा लाभ देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी तहसिलदार कैलास देवरे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष के बी साळुंखे, पं.स.स्मितलताई बोरसे, जि.प.सदस्य मोहिनी अनिल गायकवाड, उपसभापती संजय पाटील, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, पं.स.सदस्या सौ.रुपाली पियुष साळुंखे, भाऊसाहेब पाटील, माजी जि.प.सदस्य धर्मा आबा वाघ, सरपंच चंद्रभान जाधव, लोकनियुक्त सरपंच संघमित्रा चव्हाण, गटप्रमुख भैय्यादादा वाघ, सदस्या सुभद्राबाई भीमराव देवरे, डी..एम.महाजन, ममता मंगेश महाजन, पं.स.कृषी विभागाचे भालेराव, महिला बालकल्याण विभागाच्या मुख्यसेविका श्रीमती एस.आर.पाटील, खडकीसिम येथील अ‍ॅड राजेंद्र सोनवणे, तिरपोळे सरपंच पंडीत जाधव, समाधान शिबिराचे समन्वयक व करगावचे माजी उपसरपंच दिनकर राठोड यांच्यासह तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.