पाच मिनिटात आटोपली सर्वसाधारण विशेष सभा
जळगाव- समान निधी वाटपाच्या मुद्दयावरुन पाच ठरावांना विरोध झाल्यानंतर मंगळवारी जि.प.ची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. या सभेला सुरुवात होताच विरोधकांनी मागील इतिवृत्त संदर्भात काय झाले अशी विचारणा करत गोंधळ घातला. दोन्ही बाजूने गोंधळ सुरू असतांना पाच मिनिटाच एक ते अकरा विषयांना मंजुरी देण्यात आली. यानंतर विरोधकांनी सभेतून काढता पाय घेत, जि.प.समोर ठिय्या मांडत सत्ताधार्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
समान निधी प्रत्येकाला मिळाला पाहिजे तो आमचा हक्क असून बेकायदेशीररित्या ठराव मंजूर करण्यात आले आहे, आमचे काही एैकून घेतले नाही, यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते शशीकांत साळुंखे, शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन व शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील यांनी सांगितले. 10 मिनिट घोषणाबाजी सुरु होती. यानंतर सत्ताधारी गट आला व दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली. समाननिधीच्य वाटपावर विरोधक ठाम होते.