समान निधी वाटप करण्याची शेतकर्‍यांची मागणी

0

जळगाव । मौजे.बुधगाव येथील भूसंपादन क्र. 36/02 ता.चोपडा अंतर्गत बुडीत क्षेत्रात येणार्या प्रकरणांचा अतिम निवाडा झालेला असून टप्पा 1 नुसार अदा करावयाची रक्कम 12 कोटी 23 लक्ष रुपये कार्यकारी अभियंनता निम्न तापीप्रकल्प अमळनेर यांच्याकडे जमा करण्यात आलेला आहे. रक्कम करण्याची जी यादी भूसंपादन अधिकारी यांच्याकडे पाठविली आहे. ती यादी अन्यायकारक असून टप्पा प्र. 1 मधील शेतकर्‍यांना मिळणार्‍या निवादातील रक्कमेच्या 80 टक्के रक्कम समप्रमाणात मिळणे आवश्यक आहे. कार्यकारी अभियंता यांनी कोणताही अधिकार नसतांना अंतिम निवडा रक्कम वाटपाची यादी केलेली असून चुकीची आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे ही यादी रद्द व्हावी तसेच निवडा रक्कमेची 80 टक्के रक्कम प्रत्येक शेतकर्यांना समान मोबदला मिळावा यामागणी साठी चोपडा तालुक्यातील शेतकर्‍यानी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी निवेदन दिले आहे.

ठिय्या आंदोलनाचा ईशारा
महामंडळाने पारित केलेल्या आदेशाने 12 कोटी 23 लक्ष रुपये मंजूर केले आहे. त्यापैकी कार्यकारी अभियंता यांनी जळगाव भूसंपादन अधिकारी यांच्याकडे 11,67,94,000/- अशी रक्कम जमा केली. मात्र उर्वरित रक्कम 55 लाख 6 हजार ही रक्कम कशी खर्च केली ? त्याचा उल्लेख नाही ती रक्कम खर्च करताना तापी महामंडळ कार्यकारी संचालक यांची पूर्व परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक होते. ती परवानगी कार्यकारी अभियंता रा.गो.पाटील यांनी घेतली आके काय? याबाबत चौकशी करावी. जर उर्वरित रक्कम खर्च केली नसेल तर ती रक्कम दि. 09/06/2017 अखेरपर्यंत भूसंपादन कार्यालयाकडे पाठवावे व त्यांच्या सोबत 80 टक्के निधी वाटप करण्याची यादी देखील पाठविणे गरजेचे आहे. मात्र मागण्याची पूर्तता न झाल्यास 12 जून पासून कार्यकारी अभियंता रा.गो.पाटील यांच्या दालनात सर्व शेतकर्‍याना न्याय मिळत नाही तो पर्यत ठिय्या आंदोलनाचा ईशारा शेतकर्‍यान कडून देण्यात आला आहे.

यांचा होता सहभाग
शालीग्राम सोनवणे, भागवत पाटील, नाना कोळी, कल्पना भोई, बारकू कुंभार, चावदस कोळी, पुरुषोत्तम पाटील, वामन पाटील, वसंत पाटील, दिनेश पाटील, सुरेश कोळी, यशवंत सोनवणे, पांडुरंग कोळी, भागीरथ कोळी, नामदेव कोळी, रामसिंग भिल, राकोरबाई कोळी, युवराज भोई, आनंदा शिरसाठ, सिताराम भिल, भिमसिंग भील, मिराबाई कोळी,चंद्रदेवसिंग भिल, स्वामीनाथ पाटील, भीला भिला, बुधा कोळी, चंद्रशेखर पाटील, राजेद्र धोबी, सुका भिल, रविंद्र सोनवणे, गुलाब पाटील, प्रकाश कोळी, रामदास कोळी, राजेंद्र कोळी, राजेंद्र सोनवणे, दगा बर्हाटे, सखुबाई कोळी, रविंद्र सोनवणे, आनंदा बर्‍हाटे, प्रशांत सोनवणे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.