समान पाणीपुरवठा योजनेच्या निविदेत चुका

0

पुणे । शहरातील बहुचर्चित 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिनी, पाणी मीटर आणि फायबर ऑप्टीकल केबलसाठी डक्ट टाकणे या तिन्ही कामासाठी घाईघाईत काढलेल्या निविदेत चुका असून तारखाचा घोळ झाला आहे. निविदा भरण्याच्या अंतिम मुदतीचा कालावधी कमी आणि कागदपत्रे विकत घेण्याचा कालावधी जास्त असा प्रकार घडल्यामुळे या संदर्भात आता पालिकेला जाहीरात दुरुस्तीपत्रक काढावे लागले आहे.

शहरातील बहुचर्चित 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिनी, पाणी मीटर आणि फायबर ऑप्टीकल केबलसाठी डक्ट या तिन्ही कामासाठी पालिकेने यापूर्वी काढलेल्या निविदेमध्ये रिंग झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे ही निविदा जीएसटीचे कारण पुढे करून रद्द केली. त्यानंतर एसजीआय या इटालियन कंपनीने जलवाहिनी, पाणी मीटर आणि फायबर ऑप्टीकल केबलसाठी डक्ट टाकणे या तिन्ही कामाचे एकत्रित पूर्वगणनपत्रक 2,615 कोटींचे तयार करण्यात आले होते. त्यावर या कामासाठी 2,325 कोटीच्या एकत्रित पूर्वगणनपत्रकाला एस्टीमेट कमिटीने मान्यता दिली होती. त्यात तब्बल 290 कोटींनी एस्टीमेट कमी झाले होते. कमिटीने मान्यता दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसात अतिघाईत या कामांची निविदा काढली आहे.