समालोचनातून लाखोंची कमाई करणारे क्रिकेटपटू

0

मुंबई। बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत संस्था आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून नुकतेच भारतीय संघातील खेळाडूंच्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात आली. याशिवाय, या खेळाडूंना आयपीएलमधूनही अतिरिक्त कमाई मिळते. त्यामुळे देशातील क्रिकेटपटू मालामाल होताना दिसतात. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही माजी क्रिकेटपटूंसाठी कमाईची दारे उघडीच असतात. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानाबाहेर पडल्यावर सामन्याचे समालोचन करणे उत्तम पर्याय उपलब्ध असल्याने त्याकडे वळून लाखो रूपयांची कमाई करतात. नवज्योतसिंग सिध्दू – भारताचा माजी सलामीवीर फलंदाज ज्याप्रमाणे जो संघासाठी खेळतांना फलंजादी करित असे त्याप्रमाणे हिन्दीतून अनोखी शैलीतून व मुहावरे यांचा उपयोग करून क्रिकेटचे समालोचन करित आहे.त्याचे हिदीतून समालोचन करून अनेकांना त्याने आपल्या शैलीचे दिवाणे केले आहे. तो ही 40-50 लाखाच्या मानधन घेत असल्याचे समजते.

रवी शास्त्री : भारतीय संघाचे संचालक राहिलेले रवी शास्त्री यांना गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कॉमेंट्री करण्यासाठी 56.93 लाख इतके मानधन देण्यात आले होते. सध्या शास्त्री आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत आहेत. यातूनही शास्त्री रग्गड कमाई करत आहेत.

सुनील गावस्कर : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही कॉमेंट्री क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. गावस्कर यांनाही 56.93 लाखाचे मानधन मिळत आहे.

संजय मांजरेकर : माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचे क्रिकेट करिअर संपुष्टात आल्यानंतर त्यांनीही कॉमेंट्री विश्वातच आपला मोर्चा वळवला. संजय मांजरेकर यांना कॉमेंट्रीतून 42 लाख इतके मानधन मिळते.

एल.शिवरामकृष्णन: माजी क्रिकेटपटू एल.शिवरामकृष्णन हे देखील कॉमेंट्री विश्वातील मोठे नाव आहे. कसोटी सामना असो वा ट्वेन्टी-20..प्रत्येक सामन्यात आपल्या वेगळ्याच अंदाजाने कॉमेंट्री करण्याची वेगळी पद्धत आहे.