अहमदनगर – समृद्धी महामार्गावरून तालुक्यातील काही मंडळींनी यातही राजकारण चालू केले आहे. मात्र, शिवसेना एकमेव असा पक्ष आहे की तो शेतकऱ्यांबरोबर आहे. कोपरगाव तालुक्यातील दहा गावांतील समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. त्यासाठी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व बाधित शेतकरी यांची मातोश्रीवर भेट घडवून आणू व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ,” असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते नितीनराव औताडे यांनी केले