मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर अखेर आज बुधवारी शिक्कामोर्तब झाले. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे आता पुढची कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
फडणवीस सरकारमध्ये या महामार्गाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याबाबत विचार सुरू होता. मात्र उद्धव ठाकरे सरकारने या महामार्गाला आता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे निश्चित केले आहे.