नाशिक। नाशिक जिल्ह्यातील प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाविरोधात शेतकर्यांनी एल्गार पुकारला आहे. जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शवण्यासाठी शेतकर्यांनी आज 27 एप्रिल रोजी राज्यव्यापी चक्काजाम आणि जेलभरो आंदोलनाचे आयोजन केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये आज मोठं जनआंदोलन उभं राहणार आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांकडून शेतकर्यांना नोटीसा बजावण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या कामात अडथळा आणल्याने तुमच्यावर कारवाई का करु नये?, अशी विचारणा या नोटीसमध्ये केली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकर्यांचा विरोध डावलून मोजणी सुरु केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.