जळगाव महापालिकेतील भाजपामधील आणखी 9 ते 12 नगरसेवक फुटून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा असल्येचे वृत्त जनशक्ती ने नुकतेच दिले होते.या वृत्ताला शिवसेनेच्या महापालिकेतील एका वरिष्ठ नेत्याने दुजोरा दिला असून येत्या काही दिवसात भाजपा मधून 9 ते 12 नगरसेवक फुटून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. ते म्हाणाले कि , जळगावच्या विकासासाठी जे कोणी आमच्या सोबत यायला तयार असतील त्या सर्वांना आम्ही आम्हाच्या सोबत घेऊ आणि यात समोरचा अख्खा पक्ष जरी आमच्या सोबत आला तरी आम्ही जळगावच्या विकासासाठी त्यांना आमच्या बरोबर घेऊ.पढे ते असेही म्हणाले ज्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे ते आमच्या सोबत यायला तयार आहेत. मात्र नक्की त्या नगरसेवकांची नाव मात्र शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने काही सांगितले नाही.