समोरासमोर दुचाकी धडकल्या दोघांना केली बेदम मारहाण

0

जळगाव । कानळदा रस्त्यावर बुधवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास दोन दुुचाकींची समोरासमोर धडक झाली. कानळद्याकडून येणार्‍या दुचाकीवरील तरूणांनी दुसर्‍या दुचाकीवरील तरूणांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी गुरूवारी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मानराज मोटर्समधील कर्मचारी कुणाल उमेश पाटील (रा. कुवारखेडा), हर्षल श्रावण चौधरी (वय 23, रा. कानळदा) हे बुधवारी सायंकाळी काम संपल्यानंतर त्यांच्या दुचाकीने (क्र. एमएच.19.सीके.1461) गावाकडे जात होते. सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास कानळदा रस्त्यावर समोरून येणार्‍या काळ्या रंगाच्या दुचाकीने (क्र. एमएच.19.777, पूर्ण क्रमांक नाही) धडक दिली. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन कुणाल आणि हर्षल यांना बेदम मारहाण केली दुचाकीचेही नुकसानकरून मारहाण करणारे जळगावच्या दिशेने पसार झाले. या प्रकरणी कुणाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.