जळगाव। जिल्हा पोलिस ठाण्यासमोर बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याची घटना घडली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाली आहे.
बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिस ठाण्यासमोरून जाणार्या दोन दुचाकी वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर होवून अपघात झाला. यात तरूणाला व महिलेला किरकोळ दुखापत झाली. मात्र, दोघांचीच चुकी असल्याने दोघांनी अपघातानंतर काढता पाय घेतला.