नशिराबाद गावाजवळील वळणावरील घटना
जळगाव – नशिराबाद गावाजवळील वळणावर भरधाव वेगाने येणाऱ्या दोन ट्रकचा समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दोन्ही ट्रकवरील
चालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली असून दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात
शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. स्वरूप नवाती चमारू नवाती आणि दुर्वासभाई सिंगाभाई गामीत असे दोघे मयतांची नावे आहेत.
या घटनेबाबत नशिराबाद पोलीसात दोघांची आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.