समोर येणार्‍या प्रत्येक कामांमध्ये कागद नव्हे, त्यातील मानवी चेहरा ओळखावा

0

धुळे । आपल्या समोर येणार्‍या प्रत्येक कामामध्ये कागद नव्हे, तर त्यातील मानवी चेहरा ओळखावा. प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि ओझे यातील फरक ओळखून काम केले, तर आपले आयुष्य सुसह्य, सुखकर आणि समाधान देणारे ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नागरी सेवा दिनानिमित्त केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी राजेन्द्र पाटील आदी उपस्थित होते. तत्पूर्वी तहसीलदार अनिल गावित यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची सविस्तर माहिती दिली.

विविध उपक्रमांचे सादरीकरण
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी डिजिटल ई साप्ताहिक 39;यशार्थ39; या विषयी, तर महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरीष्ठ समनव्यक अधिकारी अरविंद गोरे, वनक्षेत्रपाल सी. एच. पाटील, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी दीपक काकोरकर यांनी विज्ञान डेअरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सांगळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सुधाकर शिरसाट, निकुंभे येथील प्राथमिक शिक्षक सतीश शिंदे यांनी उपक्रमांचे सादरीकरण केले.

लोकसेवा हक्काची माहिती
यावेळी उपजिल्हाधिकारी प्रदीप भोये, रवींद्र भारदे, तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, नितीन गावंडे, जिल्हा पुनवर्सन अधिकारी शुभांगी भारदे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, सहाय्यक वन सरंक्षक रेवती कुलकर्णी, तहसीलदार अमोल मोरे, संदीप भोसले, प्रशांत पाटील, रोहिदास वारुळे , सुदाम महाजन, दत्ता शेजूळ, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे उपस्थित होते.

‘यशार्थ’ अभिनव उपक्रम
नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा माहिती कार्यालाय, धुळे यांच्यातर्फे प्रकाशित होणारे डिजिटल ई साप्ताहिक ‘यशार्थ’चा नावीण्यपूर्ण व अभिनव उपक्रम म्हणून गौरव करण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी ‘यशार्थ’ या साप्ताहिकाविषयी माहिती दिली. यावेळी माहिती सहाय्यक गोपाळ साळुंखे, दूरमुद्रक चालक मनोहर पाटील, लिपिक नि टंकलेखक संदीप गावित यांचा जिल्हाधिकार्‍यांनी प्रशस्तीपत्र देवून सत्कार केला.