सयंत्र बांधकाम लाभार्थ्यांची झाली निवड

0

नवापूर । राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना व खत व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेकडून कृषी विभाग पंचायत समिती नवापूर गटास 15 सयंत्र बांधकामाचे लक्षांक प्राप्त झालेले होते. त्यानुसार सुळी येथील 10 मोरथुवा येथील 4 व आमपाडा येथील 1 अशी एकूण 15 गरजू लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेतून अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रती सयंत्र बांधकामाकरिता 11 हजार रूपये तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 9 हजार रूपये अनुदान मिळते. सयंत्रास शौचालय जोडल्यास अतिरिक्त 1200 रु अनुदान देण्यात येते.

योजनेचे विविध फायदे
या योजनेमुळे जाळण्या करीता लाकूड गोळा करणे, धुरा पासून होणार्‍या त्रासापासून महिलांची सुटका झाली,आर्थिक बचत झाली आहे. यामुळे पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत झाली. या योजनेच्या लाभामुळे शेतीसाठी चांगल्या प्रकारचा खत प्राप्त होत आहे. यामुळे लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तरी येत्या आर्थिक वर्षात जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे व गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केले आहे. योजनेच्या अधिक माहिती करीता पंचायत समिती येथील कृषी विस्तार अधिकारी विश्‍वास बनसोडे यांच्याशी संपर्क साधावा असे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.