सरकाटे यांच्या गझल संग्रहास मानांकन

0

भुसावळ । भुसावळ विभागाचे माजी मंडळ रेल्वे सुरक्षा आयुक्त तथा गझलकार आर.एन. सरकाटे यांच्या ‘आसवांचे हार झाले’ या गझल संग्रहास नुकताच नाशिक कवी साहित्यिक मंडळाकडून पुरस्कार जाहिर झाला आहे.

37 काव्य संग्रहातून त्यांच्या गझल संग्रहास मानांकन मिळाले. सरकाटे यांचा हा दुसरा गझल संग्रह असून त्यांचा ‘गर्जना’ हा गझल संग्रह या अगोदर प्रकाशित झाला आहे. त्यांच्या गझला आंबेडकरी गझला म्हणून प्रसिद्ध आहे. ‘आयपीएस’ ही नवी कादंबरी लवकरच प्रकाशित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.