मुंबई- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. अजित पवारांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधकांचे म्हणणे सरकार ऐकून घेत नाही. विरोधकांचे म्हणणं विचारात घेऊनच अंतिम निर्णय घ्यायला पाहिजे. सरकारच्या अशा भूमिकेमुळे समाजाला न्याय मिळणार काय, याबद्दल आम्ही साशंक आहोत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी केला आहे. घटनेच्या चौकटीत बसून आरक्षण द्यावे. धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.
आता ते केंद्राच्या हातात असल्याचं सांगत आहेत. सरकार शब्दांची फसवणूक करत आहे. आम्ही सरकारचे बुरखे फाडण्याचा प्रयत्न करणार आहोत, असंही अजित पवार म्हणाले आहेत. दुष्काळाची कोरडी घोषणा नको, शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी 50 हजार आणि फळबाग, ऊस, केळीला लाख रुपये मिळालेच पाहिजेत, असे धनजंय मुंडे म्हणाले आहेत.