मुंबई: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाविकास आघाडी सारकरचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत गाडीचे स्टेअरिंग अजित पवारांच्या हातात आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. त्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकार तीन चाकी असले तरी स्टेअरिंग माझ्या हातात आहे असे विधान केले होते. त्यानंतर आज अजित पवार यांनी वाढदिवसानिमित्त हा फोटो शेअर करून काय तो राजकीय संदेश दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Best wishes to the Hon. CM of Maharashtra, ShivSena Party President & Maha Vikas Aghadi Leader, Shri. Uddhav Thackeray ji. Wish you a healthy & long life!
@OfficeofUT
@CMOMaharashtra https://t.co/PlrNgNg508