वणी: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मनसे देखील यंदाची विधानसभा निवडणूक लढवीत आहे. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे प्रचारसभा घेत आये. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मागील २०१४ च्या निवडणुकीत राज्यात सत्ता आणण्यासाठी भाजपने जनतेला अनेक आश्वासने दिली, मात्र आश्वासनपूर्ती करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरली असल्याचे सांगत २०१४ मध्ये भाजपने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी मी जनतेकडे आलो आहे असे राज ठाकरे यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या चुकीमुळे लोकांनी भाजपला सत्ता दिली, मात्र हे त्यांच्यापेक्षाही बेक्कार निघाले असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
नोटबंदी आणि रोजगाराच्या प्रश्नावरून राज ठाकरे यांनी पुन्हा सरकारला लक्ष केले. देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आहे, मंदी दूर करण्यात सरकार अपयशी ठरल्याचे आरोप राज ठाकरे यांनी केले.