सरकारच्या निषेधार्थ शिक्षकांचे मुंडण

0

मुंबई : 1995-96 पासून सेवेत कायम असूनसुद्धा फक्त 1 नोव्हेंबर 2005 ला शाळा 100 टक्के अनुदानावर आल्या नाहीत म्हणून महाराष्ट्रातील 36,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना जुन्या पेन्शनपासून वंचित ठेवण्यात आले आहे. याच शिक्षकांपैकी 102 शिक्षकांनी बुधवारी मुंबईतील आझाद मैदाना येथे मुंडण करून सरकारचा निषेध केला होता. मंत्रालयात न बोलावणे आल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कपात बंद केलेल्या शिक्षकांची कपात तात्काळ सुरू करण्यात येणार आहे.

मंगळवारी अमरावती शिक्षक संघर्ष संघटनेने जुन्या पेन्शन चालू करण्यासाठी सरकार तयार नसल्याच्या निषेधार्थ मुंडण करण्याचा इशारा दिला होता. ज्या 2005 नंतर शिक्षकांचे जीपीओ कपात सुरू करावी, त्याचबरोबर शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्या या शिक्षकांनी केल्या होत्या. त्यातील एक मागणी म्हणजे जीपीओ कपात ज्या शिक्षकांची बंद आहे, त्या शिक्षकांची कपात लागलीच सुरू करण्यात येणार आहे. मात्र जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वित्त विभाग तयार नसल्याने शिक्षणमंत्री वित्त विभागाशी बोलून लवकरच यावर तोडगा काढण्यात येणार आहे.