सरकारच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचवल्या -रक्षा खडसे

0

नाथाभाऊंची शिकवण अंमलात आणून मतदारांपर्यंत पोहोचल्याची व्यक्त केली भावना

भुसावळ- गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात अनेक चांगले-वाईट अनुभव आले, त्यातून शिकायलाही मिळाले मात्र नाथाभाऊंनी दिलेल्या शिकवणुकीतून मतदारांपर्यंत पोहोचले, त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला, आज रेल्वे उड्डाणपुलांचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागला असून केंद्र सरकारच्या विविधांगी योजना नागरीकांपर्यंत पोहोचवल्याची ग्वाही खासदार रक्षा खडसे यांनी येथे दिली. बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य करण्याची संधी आपल्याला मिळाली, भविष्यातही ही संधी मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.ग्राऊंड) वर गुरुवारी झालेल्या खासदारांच्या ‘समर्पण’ या कार्यवृत्तांताच्या प्रकाशन व विविध विकासकाामंच्या उद्घाटन कार्यक्रमप्रंसगी प्रसंगी त्या बोलत होत्या.

या प्रमुख मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींची व्यासपीठावर उपस्थिती होते.