वरणगाव। सरकारच्या विरोधातील संघर्ष हा आपल्याला जिंकायचा आहे. तरी या संघर्ष यांत्रेच्या सभेसाठी सात तालुक्यातील शेतकरी यांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आमदार सतीष पाटील यांनी केले. ते वरणगाव येथे आायोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शेकाप, रिपब्लीकन (कवाडे गट) समाजवादी पक्ष यांच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा 15 एप्रिल पासून सिंदखेड राजा येथून वरणगाव शहरात आगमन होवून शहरात सायकाळी 7 वाजता शेतकर्यांच्या कर्जमुक्ती करीता शासनाच्या विरोधात सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार सतीष पाटील यांनी सांगितले.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, सघर्ष यात्रा हि सर्वांची लढाई न होता पक्षश्रेष्ठींसाठी संघर्षाची होईल, लढाई सन्मान जिंकण्यासाठी नसून शेतकर्यांना न्याय मिळून देण्याकरीता आहे. खर्या अर्थाने महाराष्ट्राचे शेतकरी नोटबंदीमुळे कमालीचा खचले असून त्याच्या पिकाचे व मालाचे भाव कोलमळ्ले आहे.
यांची होती उपस्थिती
राज्यात 390 शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या असून या भावनेच्या माध्यमातून आपण सर्व विरोधी पक्षातील आमदार, खाजदार, माजी मुख्यमंत्री सर्वानी शेतकर्यांच्या पाठीमागे आहोत. संघर्ष हा विचाराने व भावनेचा विषय असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, अरुण पाटील, डॉ. उल्हास पाटील, सदिप पाटील, रविंद्र पाटील, रवी पाटील, डी.जी. पाटील, जिल्हा सरचिटणीस बराज पाटील, रवी निकम, योगेंद्र पाटील, जगन सोनवणे, नगरसेवक राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार राजेंद्र चौधरी मानले.