सातारा । ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून राष्ट्रवादीने भाजप सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा काढला. शक्तीप्रदर्शन करत काढलेल्या मोर्चात जिल्ह्यात अनेक दिग्गज्ज नेते सहभागी झाले होते. माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. राष्ट्रवादीच्या मोर्चाचे चौका-चौकात वेगळ्या पद्धतीने स्वागत करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. मोर्चात सामील बैलगाड्या, कार्यकर्त्यांची घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
राष्ट्रवादीने ताकद दाखवत सरकार विरोधी केलेल्या यल्गाराची चर्चा शहरात रंगली होती. वाढती महागाई, फसलेले निर्णय, कर्जमाफीयासह अनेक मागम्यांना घेवून राष्ट्रवादीने येथे हल्लाबोल मोर्चास प्रारंभ केला. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्यभर राष्ट्रवादी हल्लाबोल मोर्चा काढणार आहे. त्याची सुरवात येथून झाली. मोर्चात राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार, माजी मंत्री जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रराजे भासले आदी उपस्थीत होते.